भारतीय बौद्ध महासभेची विधानसभाकरीता उमेदवाराची यादी वरिष्ठांकडे

भुसावळ :- जळगाव जिल्हा शाखा (पूर्व) अंतर्गत दिनांक 16/08/2024 रोजीची बैठक भारतीय बौद्ध महासभेचे कार्यअध्यक्ष डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशनुसार बैठक ही पीपल्स इंटरनॅशनल स्कुल पिळोदा रोड, भुसावळ येथे संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष हे जिल्हा अध्यक्ष रविन्द्र वानखेडे हे होते.

तर प्रमुख मार्गदर्शक के. वाय. सुरवाडे, सुमंगल अहीरे, प्रकाश सरदार, डॉ.संजीवकुमार साळवे,रविंद्र मोरे, वंचितचे जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे, सुशीलकुमार हिवाळे ,भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाडे यांनी संभाव्य उमेदवार कसा असावा व भुसावळ विधानसभा क्षेत्राचे अभ्यासपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले. तसेच आलेल्या भुसावळ विधानसभा करीता उमेदवारच्या नावाच्या यादीची चाचपणी कऱण्यात आली. त्यातील जे आंबेडकर चळवळीशी एक निष्ठ नाहीत आशांची नावे वगळून बाकी नावे पूढे केंद्रीय कार्यकारिणीकडे पाठविण्यात येईल या बाबत ठराव बैठकीत करण्यात आला.

या बैठकीचे सूत्रसंचालन भुसावळ तालुका सचिव अरूण तायडे यांनी केले. बैठकीचा प्रमुख उपस्थितीत राज्य संघटक लता तायडे, जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, जामनेर तालुका अध्यक्ष माणिकराव लोखंडे, ए. टी. सुरडकर, प्रितीलाल पवार, मेजर अनिल वानखेडे,मुक्ताईनगर तालुका कोषाध्यक्ष पंडीत सपकाळे, श्रावण साळुंखे, तालुका उपाध्यक्ष आनंदमित्र सपकाळे, ॲड, प्रविण इंगळे, नितीन बोदडे, वंचित चे तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर, एस. पी. जोहरे, कैलास सपकाळे, राजेन्द्र अडकमोल इत्यादी उपस्थिती होती. सर्व उपस्थितांचे आभार भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाडे यांनी केले.

ताजा खबरें