भारतीय बौद्ध महासभाची बोदवड तालुका कार्यकारणी घोषित

बोदवड – येथे तक्षशिला बुध्द विहार, साखला कॉलनीत आज रोजी ०५/०८/२४ रोजी भारतीय बौद्ध महासभेचे महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे व सरचिटणीस वैशाली सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बोदवड तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली.

त्यावेळी बैठकीला जिल्हा संघटक बी. के. बोदडे, प्रकाश सरदार, सिंधू निकम, करुणा नरवाडे, सचिव संरक्षण विभागाच्या सचिव पल्लवी गुरचळ, सुनीता सुरडकर, रमा सावळे, अनिता सुरडकर, संतोष निकम, वंदना सुरडकर, चेत्राम सुरडकर, तालुका सरचिटणीस प्रमोद सुरवाडे, भिमराव सुरवाडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली. अध्यक्ष पदी उज्ज्वला गवली, सरचिटणीस माधुरी सावळे, कोषाध्यक्ष ममता इंगळे, संस्कार विभागाच्या उपाध्यक्षा सविता सावळे, समता सैनिक दल उपाध्यक्ष रंजना गवई, हिशोब तपासनीस सुनीता सुर्यवंशी, कार्यालयीन सचिव अनिता सोनवणे संस्कार सचिव अनिता वाघ, पर्यटन सचिव ममता सुरवाडे,सचिव सविता सावळे, निर्मला बावसकर, संघटक उज्ज्वला सुरवाडे, मंगला इंगळे, रंजना बावस्कर, दिपाली सोनवणे, लिला बोदडे, शिला तायडे, लक्ष्मी सुर्यवंशी, रंजना बावस्कर, मंगला इंगळे नविन कार्यकारणी घोषित करण्यात आल्या नंतर त्याचा प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटीं आभार प्रदर्शन सिंधू निकम यांनी केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh