आमदारांच्या हस्ते कुऱ्हा पानाचे पोलीस चौकीचे उद्घाटन !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे औट पोष्ट च्या पोलीस चौकीचे उद्घाटन आ. संजयभाऊ सावकारे व पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन औट पोष्ट च्या ठिकाणी करण्यात आले होते. सर्व प्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर उद्घाटन फलक व पोलीस चौकीचे फित कापून आमदारांच्या आदेशाने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो नि महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदारांनी दाखवलेल्या मोठेपणामुळे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक डाँ. महेश्वर रेड्डी म्हणाले ज्या गावातील नागरीक चांगले असतात त्या गावात पोलीसांना जायची गरज पडत नाही. विशेष म्हणजे पोलीसांना बोलवायचे असेल तर चांगल्या कामासाठी बोलवा असे सांगीतले त्यानंतर आ. संजयभाऊ सावकारे उद्घाटन पर भाषणात म्हणाले की पोलीस चौकी मुळे या परिसरातील नागरीकांना भुसावळ येथे जाण्याचा त्रास वाचेल तसेच पोलीसांबद्दल आदरयुक्त भिती असावी असे सांगीतले आभार प्रदर्शन करते वेळी पोलीस उप अधिक्षक कृष्णांत पिंगळे यांनी तालुका पोलीस स्टेशन च्या कार्यांचा गौरव व कौतुक करत सर्वांचे आभार मानले.

यावेळी कुऱ्हा पानाचे सरपंच कविता, भुसावळ शहर चे पो नि उध्दव डमाळे, बाजार पेठ पोलीस स्टेशन चे राहुल वाघ, तालुका पोलीस स्टेशन चे एपीआय जनार्दन खंडेराव, पोऊनि संजय कंखरे, श्री दराडे व कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे एएसआय युनूस शेख, उमेश बारी, हेमंत मिटकरी, बाविस्कर तसेच वाल्मिक सोनवणे, मोरे, नखुले, पारधी व पोलीस कर्मचारी तसेच पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरविंद बाविस्कर यांनी केले.

ताजा खबरें