जळगाव, प्रतिनिधी दि.०७ :- जिल्ह्यासह मतदारसंघातही सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रातील कोट्यावधींची कामे केली असून काही अनेक मंजूर आहेत. कुरकुर नाल्यावरील बांधलेल्या ८ कोटींचा पूल व रस्ते शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरत आहे. भागपुर धरणाचे काम एक ते दीड वर्षात पूर्ण होवून सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याने या परिसरातील १५- २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. बजेट अंतर्गत पाथरी – म्हसावद रस्ता व जवखेडा- वडली रस्ता आणि बिलवाडी ते वडली श्रीकृष्ण मंदिरा पर्यतचा रस्ता (२ कोटी ५०) लाखाच्या कामाला ८ दिवसात सुरुवात होणार आहे. कार्यकर्त्यांची व ग्रामस्थांची भक्कम साथ आहे म्हणून सर्वसमावेशक विकास होत आहे. केवळ मतांपुरते राजकारण कधीही केले नाही. जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना महत्व दिले आहे. मतदार हाच माझा समाज असून विकास हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बिलवाडी येथे १० कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण प्रसंगी जाहीर सभेत केले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला. यावेळी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी भगवे ड्रेस परीधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेच्या मुलीनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले.
यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, भवानी मातेच्या मंदिराचा “क” वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करणार असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पाथरी ते बोरनार, डोमगाव ते म्हसावद, रामदेववाडी ते म्हसावद जवखेडा ते सुभाषवाडी या रस्त्यांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. म्हसावद ग्रामीण रुग्णालयाच्या ३० कोटीच्या बांधकामाला महिनाअखेर प्रशासकीय मंजुरी मिळणार असल्याची ग्वाही दिली. तसेच जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, रमेश आप्पा पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
या कामांचे झाले लोकार्पण
नविन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम (२० लक्ष ), बिलवाडी ते बिलखेडा रस्ता डांबरीकरण (१ कोटी), पाण्याची टाकी व पाईपलाईन (३० लक्ष), बिलवाडी कडुन बिलखेडा रस्ता वरिल पुलाचे बांधकाम (१.५ कोटी), बिलवाडी फाटा ते डोमगांव रस्ता डांबरीकरण (४ कोटी), स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण (६ लक्ष), स्माशानभुमी येथे काँक्रीटकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे (३ लक्ष), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छ. शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण (३ लक्ष), दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे (३ लक्ष), जि.प. मराठी शाळेकरीता संरक्षण भिंत बांधकाम (१२ लक्ष), वार्ड क्र. १ मध्ये काँक्रीटकरण, नवीन गटार बांधकाम (२१ लक्ष), वार्ड क्र. २ मध्ये पेव्हिंग ब्लॉक व काँक्रीटकरण (९ लक्ष), भगतवाडी येथील काँक्रीटकरण (६ लक्ष), विठ्ठल मंदिर जवळ सभामंडप (१० लक्ष), वार्ड क्र. ३ मधे पेव्हिंग ब्लॉक बसविणे (६ लक्ष), नदिवरील संरक्षण भिंत (१५ लक्ष), नदिवरील सिमेंट बंधारे बांधकाम (१ कोटी २० लक्ष), गुरांचा गावहाळ बांधकाम (२ लक्ष ) अश्या १० कोटी निधीतून खर्च करण्यात आलेल्या विकास कामांचे लोकार्पण विधिवत पूजा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप पाटील सर यांनी केले प्रास्ताविक उपसरपंच धोंडू जगताप यांनी केले तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य पावन सोनवणे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य , शिवसेना व युवसेना कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतेले.
यांची होती उपस्थिती
जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे,तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, लोकनियुक्त सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच धोंडू जगताप, ग्रा.पं.सदस्य रविंद्र (आबा) गोपाळ, अनिल पाटील, सुपडु गायकवाड, पल्लवी पाटील,कविता पाटील, लताबाई पाटील, प्रमिला उमरे, नंदीनी पाटील, ग्रामसेवक चंद्रशेखर वराडे, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, समाधान चिंचोरे यांच्यासह परिसरातील सरपंच रवी कापडणे, महिला जिल्हा प्रमुख सरिता कोल्हे – माळी, शोभाताई चौधरी, कल्पना गोपाळ, शितल चिंचोरे, डॉ. कमलाकर पाटील, साहेबराव वराडे, नगरसेवक गणेश सोनवणे, बापू थोरात, शेतकी संघाचे विजय पाटील, अर्जुन पाटील, सचिन पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच जळके राजुभैया पाटील, विटनेर ललित साठे, जवखेडा आनंदसिंग पाटील, मोहाडी डंपी सोनवणे, डोमगाव विश्वनाथ मंडपे, सुभाषवाडी राजाराम राठोड, पाथरी अर्जुन शिरसाठ, शिरीष चौधरी यांच्यासह परिसरातील सरपंच पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.