जळगाव येथिल अभ्यासिकेचे शुभम सरदार यांचे हस्ते उदघाटन

सामाजिक दायित्व म्हणून माझ्या पहिल्या वेतनातून अभ्यासिकेस रु. ११०००/- ची पुस्तके देणार – शुभम सरदार

जळगाव – जळगांव येथे समाजातील गरीब होतकरू, गरजवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सरावा करीता सर्व सुविधा युक्त अभ्यासिका कक्षाचे उदघाटन केंद्रीय लोक सेवा आयोग (यु. पी. एस. सी.) परिक्षेमध्ये भारतात राखीव गटातून प्रथम येणाऱ्या शुभम सरदार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी झाल्टे प्रतिष्ठाणचे ऍड. राजेश झाल्टे, सूर्य जिवनी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सुनिल जाधव , सामाजिक नेते मुकुंद सपकाळे, मोहन सरदार, सुनीता सरदार, तसेच आदर्श शिक्षिका सरिता माळी आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

समाजातील नोकर पेशा असलेल्या तसेच सेवा निवृत्त समाजप्रेमी बांधवांनी जळगावात एकत्र येत सूर्य जिवणी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जळगांचे सुप्रसिद्ध विधीतज्ञ समाज भुषण दानशूर व्यक्तीमत्व असलेले अॕड. राजेशजी झाल्टे साहेब यांनी सढळ हातांने काव्य रत्नावली चौक, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातील जळगाव शहरातील अति उच्चभ्रू वस्तीतील आपल्या मालकीची ३०००/- चौ. फूट जागा (अपार्टमेंटच्या बेसमेंटची जागा) बांधकामासह विना मोबदला संस्थेला देत आपल्या सामाजिक दातृत्वाची जाणीव करुन दिली. अतिशय प्रशस्त,सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या तसेच अभ्यासीकेत संपूर्ण लक्ष देता यावे यासाठी संपूर्ण परिसर CC TV निगराणी खाली ठेवून तज्ञ मार्गदर्शक तसेच कार्यरत तथा सेवा निवृत्त सनदी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीमत्वास विनंती करुन एक टिम तयार करुन ज्ञानाचे महामेरु प्रज्ञासूर्य,प्रगल्भ पंडीत,अभ्यासक, क्रांतीसूर्य परमपूज्य बाबासाहेबांनी राष्ट्राला अर्पित केलेल्या जागतिक किर्तीच्या आदर्श लोकशाहीचा अभिमान असलेले भारतीय संविधान. संविधान सन्मान म्हणून संविधान दिनाचे औचित्य साधून सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण काल UPSC परिक्षेत AIR रँक मधून असिस्टंट कमांडन्ट पदी नुकताच देशातून १०७ व्या स्थानी तर संपूर्ण देशातून मागासवर्गीयांमधून प्रथम आलेला शुभम सुनिता मोहन सरदार याचे हस्ते झाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या विधीतज्ञ समाज भुषण अँड. राजेशजी झाल्टे साहेब यांनी आवाहन केले की, आपल्या पारिवारीक मुलांचे पालक होण्या सोबतच सामाजिक पालक होत दातृत्वरुपी हात पुढे आले पाहीजे तर समाजातील होतकरु परंतु गुणवत्ता असूनही योग्य मदतीचा हात नसल्याने अठराविश्व दारीद्यातच राहणाऱ्या मुलांचे भविष्य कधीच उज्वल होणार नाही. यासाठी एक हात मदतीचा असण गरजेच आहे यासाठी नुसत्या गप्पा ठोकून प्रबोधन होणार नाही अथवा परिवर्तन ही होणार नाही यासाठी जमेल तशी पदरमोड करत खिशाला हात घालत आर्थिक दानातून श्रमातून ज्ञानाची भक्कम साथ जोड देण गरजेच आहे सोबतच कृतीशीलतेन पुढे येण्याची गरज आहे असे आवाहन केले. याला तात्काळ प्रतिसाद देत संविधान दिनी सुरु झालेल्या सुसज्ज अभ्यासिकेला पुस्तक रुपी खरेदी साठी प्रशांत तायडे ग्राम सेवक यांनी त्यांच्या आई-वडील शिलाताई रमेश तायडे यांचे स्मृती प्रित्यार्थ ११०००/- भेट देवून संस्थेच्या वतीने होतकरु गरजवंत एका सामाजिक मुलाला दत्तक घेवून मुलाचे सामाजिक पालकत्व स्विकारण्याचा मनोदय व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ विचारवंत जयसिंग वाघ, उदयोजक संजय इंगळे आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh