हिवाळ्यात लागणार छत्री, रेनकोट साथ; पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

हिवाळ्याचे दिवस सुरू असले तरी देशातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. याचा परिणाम तापमानात वाढ होण्यात झाली असून येत्या 48 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा, अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

हवामानाच्या संदर्भात अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली. मिळालेल्या माहितीनुसार, आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. तसेच काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर लक्षद्वीपमध्येही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळ, तमिळनाडूचा काही भाग आणि कर्नाटक किनारी भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या अनेक ठिकाणी थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh