सुनसगाव परिसरात पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा ,विटभट्टी व्यावसायीकांचे लाखो रुपये पाण्यात

भुसावळ – सलग चौथ्या दिवशी संध्याकाळी या परिसरात चक्रीवादळाचा तडाखा बसला असून अनेक झाडे तसेच विज खांब उन्मळून पडले आहेत अनेक ठिकाणी काही काळ रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ते बंद होते तर काही ठिकाणी विजपुरवठा खंडित झाला आहे .

विशेष म्हणजे उन्हाळ्यात विटभट्टी व्यावसायीकांचे कामे सुरू असतात आठ महिन्यांच्या कालावधीत विटा तयार करून विकणे हा विटभट्टी व्यावसायीकांचा धंदा आहे मात्र या अवकाळी पावसाने हा परिसर अक्षरशः झोडपला असून विटांसाठी आणलेली माती , कोळसा , व तयार करण्यात आलेल्या कच्चा विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे मात्र विटभट्टी व्यावसायीकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

परिसरात शेती शिवारात मोठ्या प्रमाणात झाडे पडले आहेत तर वादळामुळे उडून गेलेल्या पत्रांच्या शोधात नागरीक भटकंती करीत आहेत .

jalgaonsandesh

jalgaonsandesh