ममुराबाद – ममुराबाद ग्रामपंचायतीमध्ये आगस्ट २०२२ मध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत चौधरी व ग्रामसेवक मुरलीधर उशीर या दोघांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता १४ वा वित्त आयोगाचा निधी खर्च केला आहे. त्यामध्ये अंगनवाडीला काही साहित्य देण्यात आले त्यामध्ये त्या साहित्याच्या अव्वाच्या सव्वा किंमती लाऊन दुकानदारा कडुन बिले देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आंगनवाडी साठी कोणत्या साहित्याची गरज होती त्याबाबतचे मागणी पत्र घेणे गरजेचे होते परंतु तसे न करता संबधीतांनी परस्पर साहित्याची खरेदी केली आहे. तसेच जि.प मराठी शाळा, व जि. प उर्दू शाळा यांचे कडून देखील मागणी पत्र न घेता अव्वाच्या सव्वा किंम्मतीचे साहित्य खरेदी केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयासाठी फर्निचरची सध्या गरज नसतांना देखील अव्वाच्या सव्वा दराप्रमाणे साहित्य खरेदी केल आहे. सदर ग्रामपंचायतीच्या नावाने खरेदी केलेले सर्व साहित्य सरपंच हेमंत चौधरी यांनी आपल्या गोडामध्ये ठेऊन सरपंच त्या साहित्याचा वापर करीत आहे. १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या अपहारा बाबत म मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव म पोलेसि अधिक्षक जळगाव. यांचेकडे तक्रार दाखल करुण जवळपास सहा महित्याचा कालावधी झाला परंतु अद्यापावेतो कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तक्रारदार महेंद्र सोनवणे यांनी तगादा लावल्यानंतर चौकशीतर झाली परंतु चौकशी अहवालावर सही करायला किवा चौकशी अहवाल वाचून पहायला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना वेळ मिळत नाही. तक्रारदार यांनी चौकशी अहवाल का देत नाही त्या बाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारीं व सहाय्यक गट विकास अधिकारी एन डी ढाके यांनी सांगतिले की या प्रकरणा बाबत राजकिय दबाव असल्याने आम्ही काहिच करू शकत नाही अशा प्रकारची उत्तरे देण्यात येत आहे. तक्रारदाराकडुन चौकशीसाठी पुरावे मागविण्यात आले ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर तपासनी झाली मग कारवाई साठी बिलंब का. आणी खरोखरच ग्रामपंचायतीमध्ये अपहार झालेला असेल तर अधिकारी राजकिय दबावाला का बळी पडत आहे. असा प्रश्न देखील पडला.