जर मुख्यमंत्री कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटू शकतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलंच पाहिजे : मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत. जर मुख्यमंत्री कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटू शकतात, तर जिल्हाधिकारी देखील कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटूच शकतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

तसेच अत्यावश्यक कामांसाठी आलेल्या लोकांना कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.

सरकारने ठरवल्याप्रमाणे अनेक प्रकल्प पूर्ण केलेत – मुख्यमंत्री शिंदे

कोकणात सरकारने ठरवल्याप्रमाणे सगळी कामं केली आहेत. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो. मी आजपर्यंत भरपूर कागदांवर सह्या केल्यात. गुवाहाटीवरुन फोन करुन मी अनेक कामं केली आहेत, कारण सगळे प्रकल्प व्हायला हवेत ही एकच इच्छा होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

‘मुख्यमंत्री सर्वसामान्य असेल तर अशी कामं होतात’

मी लोकांमधला माणूस आहे. मुख्यमंत्री सर्वसमान्य असेल तर अशी कामं होतात. राज्याच्या जनतेशी मी बांधील आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्री वेळ न घेता भेटू शकतो, तर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलच पाहिजे. हे सरकार घरी बसणारे नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय.

मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आधी फक्त अडीच कोटी खर्च झाले होते, पण आम्ही 160 कोटी खर्च केले. त्यामुळे आमचं काम बघून काहींचे पट्टे निघालेत. काहींना जालीम काढा हवाय, असा टोला देखील मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी लगावला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh