सुनसगाव येथे ७२ टक्के मतदान मतदारांचा प्रचंड प्रतिसाद !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची निवडणूक शांततेत पार पडली यावेळी मतदारांनी प्रचंड उत्साहात मतदान केले त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली मात्र पोलिसांनी व पोलीस पाटील तसेच महसूल कर्मचारी यांनी लक्ष देऊन शांततेत मतदान होण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी वार्ड क्रमांक १ मध्ये ७४ टक्के झाले ६६६ पैकी ४२८ मतदारांनी मतदान केले त्यात पुरुष २२० तर २०८ स्त्री असे मतदान झाले .वार्ड क्रमांक २ मध्ये ७८ टक्के मतदान झाले त्यात ३४९ पुरुष तर ३१७ स्री असे ८५२ पैकी ६६६ मतदान झाले तर वार्ड क्रमांक ३ मध्ये ७८ टक्के मतदान झाले १००३ पैकी ७८२ मतदान झाले यावेळी पुरुष ३९८ आणि स्री ३८४ असे मतदान झाले. साधारणतः साडेसहा वाजेपर्यंत वार्ड क्रमांक तीन चे मतदान झाले या वार्डात गोंभी येथील मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती .सुनसगाव येथे एकूण टक्के मतदान झाले. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो नि बबनराव जगताप तसेच पोलीस कर्मचारी, तलाठी, ग्रामसेविका, पोलीस पाटील सुनसगाव व गोंभी, कोतवाल यांनी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सर्व उमेदवारांनी सहकार्य केले तिन्ही वार्डात शांततेत मतदान झाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh