पारोळा – शेतात जाऊन शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे. हि घटना भोकरबारी (ता. पारोळा) येथे घडली आहे. मात्र आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
भोकरबारी (ता. पारोळा) येथील तुकाराम संतोष पाटील (वय ५४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तुकाराम पाटील हे गुरूवारी (७ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता शेतात निघून गेले. यानंतर त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तुकाराम पाटील यांनी आत्महत्या केल्याची बाब शेतातील कामगारांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत पाटील यांच्या कुटुंबियांना कळविले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवण्यात आला. याबाबत राहुल तुकाराम पाटील यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलिसांत नोंद झाली असून, पोलीस हवालदार प्रवीण पाटील तपास करीत आहेत.