आठवीमध्ये चांगले गुण मिळाले तरच नववीत प्रवेश, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

आठवी इयत्तेच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले तरच विद्यार्थ्याला नववीच्या वर्गात प्रवेश मिळू शकतो, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्र सरकारने आरटीई नियमावलीमध्ये अलीकडेच केलेली दुरुस्ती आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांनाही लागू आह

त्या पार्श्वभूमीवर आठवीत कमी गुण मिळाल्याने नववीत ढकलण्यास नकार देणाऱया शाळेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.

याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला आठवीच्या परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळाले नाहीत. त्यामुळे त्याला नववीच्या वर्गात ढकलण्यास बोरिवली येथील अजमेरा ग्लोबल स्कूलने नकार दिला. अजमेरा स्कूल ही आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न आहे. या शाळेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 2011 च्या आरटीई नियमावलीमध्ये अलीकडेच दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत कमी गुण मिळाल्यास पुन्हा त्याच वर्गात बसवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याआधारे याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला नववीच्या वर्गात न ढकलता पुन्हा आठवीच्याच वर्गात बसवण्याचा शाळेचा निर्णय योग्य आहे, असे खंडपीठाने नमूद केले.

याचवेळी आरटीई नियमावलीतील दुरुस्तीचे पूर्वलक्षी किंवा संभाव्य स्वरूप निश्चित करण्यासाठी न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी प्रलंबित ठेवली. त्यामुळे न्यायालय पुढील सुनावणीवेळी काय निर्णय देतेय याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.