रस्त्यात रडणाऱ्या मुलांना मदत करताय? थांबा! गुन्हेगारीचं नवं रॅकेट, असं अडकवतात जाळ्यात

देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशाच काही उदाहरणावरुन अनेकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला दिसतो. सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने महिला सुरक्षिततेसाठी पावलं उचलली जातात.

पण गुन्ह्यांवर आळा घालणं थोडं कठीणच असल्याचं पाहायला मिळतं. याच दरम्यान आता खळबळजनक माहिती समोर आली आहे.

एखाद्या चिमुकल्याला माणुसकीच्या नात्याने मदत करणं आपल्यालाच आता अडचणीत आणू शकतं. अनेकदा भाजी मार्केट, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप यासारख्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलं दिसतात. ती रडत असल्याचं दिसताच आपल्याला त्यांची दया येते आणि आपण मदतीसाठी पुढाकार घेतो. त्यांची आपुलकीने चौकशी करतो. पण असं करणं आता महिलांना आणि मुलींना महागात पडत आहे. अशा प्रकारे गुन्हेगार त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत.