आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दोन गाड्या एकमेकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तानाजी सावंत हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी हा अपघात झाला आहे.

तानाजी सावंत यांच्या ताफ्यात सात ते आठ गाड्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे. मात्र अचानक पुढील गाड्यांचा वेग कमी झाल्यामुळे एकावर एक गाडी आदळली आहे. यातच दोन वाहन एकमेकांसमोर आल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात तानाजी सावंत यांचे सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तानाजी सावंत हे ताफ्यातील दोन नंबरच्या गाडीत होते. हा हा अपघात त्यांच्या ताफ्यातील तीन आणि चार नंबरच्या गाडीमध्ये झाला आहे. अपघातानंतर त्यांचा ताफा आता कोल्हापूरच्या दिशेने पुढे आला आहे. इथं ते नियोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.