बोरवान येथील देवमोगरा माता यात्रेमध्ये सेवाभावे प्रतिष्ठान तर्फे आरोग्यसेवा

तळोदा – तालुक्यातील बोरवान गावात जुने देव मोगरा मातेचे मंदिर आहे येथे दरवर्षी दोन दिवसांची यात्रा महाशिवरात्रीच्या पाचव्या दिवसापासून असते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील हजारो भाविक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. यावर्षी सेवाभावे प्रतिष्ठान व विमलगिरी हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले.

यावेळी विमलगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्री. सारंगजी माळी यांनी मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार केलेत. यात्रेत आलेल्या भाविकांनी व विक्रेत्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. तळोदा येथील रुद्र मेडिकलचे संचालक श्री. सौरभ भाऊ माळी हे देखील यावेळी उपस्थित होते.

या आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजयसा सोनवणे, उपाध्यक्ष श्री. सागर पाटील, सचिव श्रीमती. कविता कलाल, कार्याध्यक्ष संतोष चौधरी, संचालक श्री. नकुल ठाकरे, श्री. अतुल पाटील, श्री. अनिल नाईक, श्री. मैकू सक्सेना, चि. राज पाटील यांनी नियोजन केले.

ताजा खबरें