हातनुर धरणाचे 30 दरवाजे उघडले..

जळगाव : दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या परिसरात बुधवार झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठी वाढला आहे. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे आता धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत धरणाचे 3० दरवाजे उघडण्यात आले होते.

४२ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 42 हजार 378 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh