जय हो माझे राजकीय नेत्यांनो ! असे म्हणत कोळी समाजाच्या अंदोलनात राजकिय नेते राजकारण करत असल्याने अँड गणेश सोनवणे अंदोलना पासुन दुर..

जय हो माझे राजकीय नेत्यांनो

डॉ बाबासाहेबांचे आरक्षण सर्वांना पाहिजे, परंतू बाबासाहेबांचे नाव घेण्यास लाज वाटते, अशी ही जमात आहे.

आज तर स्वर्गातील माझे महर्षी वाल्मीकींना सुध्दा या आमदार रमेश पाटलाचे कृत्याबाबत रडू येत असेल. व असा व्यक्ती कोळयांचे कुळात जन्माला आल्याबाबत खुप पश्चाताप करीत असेल. हरदास कमिटीचा दगा फटका डोळयासमोर असतांना, पुन्हा एखादी समीती नेमून जमातीचा स्वाभीमान भाजपाचे दावणीला बांधला गेला. आणि याला जर तुम्ही विजय म्हणत असाल तर मला आता असल्या नेत्यांची चिड येते आहे.

सर्व पुढाऱ्यांकडे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र आहे, फक्त माझे गरिब जनतेकडे नाही. म्हणून आम्ही सर्व आंदोलनात उतरलो, परंतू आम्ही आता समाजाचे षडयंत्राला व शासनाचे कटकारस्थानापुढे आम्ही एकटे पडलो व थकलो आहोत. आदिवासी कोळी जमातीसाठी आम्ही प्रशासनाला अनेक वेळा भिडलो, राजकारणी लोकांना रस्याेतवर अडवीले, परंतू आदिवासी कोळी जमात आम्हाला साथ देत नाही. त्यामुळे मी ॲड गणेश सोनवणे असे घोषीत करतो की,

यापुढे कोणत्याही आंदोलनात आता ॲड गणेश सोनवणे हे भाग घेणार नाही

या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय
नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी

अशा घोषणा आता माझेकडून दिल्या जाणार नाही. इतकेच नाही तर जमातीचे कोणत्याही आंदोलनात आज नंतर ॲड गणेश सोनवणे हे दिसणार नाहीत. सर्वांना पुढील वाटचालीबाबत खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद देत, मंत्री गिरीष महाजन, व मंत्री गुलाबराव पाटील जे उपोषण सोडवायला येत आहे त्यांचे हातून लाचारी पत्करून जे मिळेल ते घ्या, व घरी जावे.

आपण सत्ताधाऱ्यांचे विरोधात जायला नको होते, कारण ते आता माझे विरूध्द कटकारस्थान करून दगा फटका देतील, त्यावेळेस मात्र आपले जमातीचा कोणताही व्यक्ती धावून येणार नाही यांची मला जाणीव आहे, त्यामुळे आता राजकीय नेत्यांचे विरोधात दुश्मनी नको.

असेही पंतप्रधान मोदी यांनी आरक्षण हे संपवलेले आहे. मग कशाला पाहिजे जात प्रमाणपत्राचा कागदाचा तुकडा,

सर्वांना ज्यांची त्याची जात मुबारक, व आपले राजकीय लोकांनी आदिवासी कोळी जमातीला भाजपाचे दावणीला बांधल्याबददल त्या सर्वांचे खुप खुप शुभेच्छा देतो, काय हा भंकस देश आहे जेथे दलितांना तो दलित आहे हे छाती फाडून सांगावे लागते, १२ दिवस अन्नत्याग करावा लागतो तरी शासन त्यांना त्यांची जात देण्यास तयार नाही. असा हा भारत देश व त्यांचे सरकार महान काम करीत आहे. त्यांचे या महान कार्यालया माझा सलाम, व आदिवासी कोळ्यांचे लाचार नेत्यांना त्यांचे पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा देतो, व मी आज पासून आदिवासी कोळयांचे न्यायहक्कासाठी आंदोलन करण्याचा त्याग करतो. व मी जास्तकाही अन्नत्याग उपोषणासाठी येागदान देवू शकलो नाही, त्याबददल सर्वांची क्षमा मागतो, धन्यवाद,

सर्वांना माझा आंदोलक म्हणून शेवटचा जय वाल्मीकी.              जय हिंद, जय भारत, ॲड गणेश सोनवणे

jalgaonsandesh

jalgaonsandesh