आयपीएल इतिहासातील ‘हा’ ठरला सर्वात महागडा खेळाडू!

दुबई – ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला, त्याने काही तासांत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा  विक्रम मोडला. स्टार्कला केकेआरने २४.७५ कोटींना विकत घेतले तर कमिन्सला २०.५० कोटी रुपयांना एसआरएचला विकले. चेन्नई सुपर किंग्जने डॅरिल मिशेलवर १४ कोटी रुपये खर्च केले.

इंडियन प्रीमियर लीग २०२४ ची (IPL 2024) तयारी पूर्ण झाली आहे. हा लिलाव दुबईत (Dubai) दुपारी एक वाजता सुरू झाला. आयपीएल २०२४ च्या लिलावात ३३३ खेळाडू सहभागी होत आहेत. लिलावाच्या यादीत अनेक बड्या खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये २१४ भारतीय आणि ११९ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ ७७ खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. परदेशी खेळाडूंसाठी ३० स्लॉट राखीव आहेत.

ताजा खबरें