पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांचे स्वागत पालकमंत्र्यांच्या साधेपणाचे प्रदीप मिश्रांनी केले कौतुक

जळगाव, दि. ५ डिसेंबर (प्रतिनिधी) -जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे आजपासून पंडीत प्रदीप मिश्रा यांचा शिव महापुराण कथेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंडीत प्रदीप मिश्रा यांचा यथोचित स्वागत करून कथा श्रवणाचा लाभ घेतला.

राज्याच्या महत्त्वाच्या मंत्री पदांवर असून पालकमंत्री गुलाबराव पाटील ह्यांचे साधे राहणीमान ही ईश्वरी कृपा आहे. असे कौतुक उद्गार पंडीत प्रदीप मिश्रा यांनी यावेळी काढले. जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने महा शिवपुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. आपत्ती संदर्भात प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहेत. याबाबत आयोजकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh