पुरी गोलवाडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.

रावेर प्रतिनिधी– राजेंद्र महाले- रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे माध्यमिक विद्ययालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय दिलीप वैद्य सर यांनी स्वीकारले तसेच विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले परीक्षे मध्ये येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या या विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुरी गावचे पोलीस पाटील किरण पाटील व भामलवाडी गावचे पोलीस पाटील प्रमोद पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक माननीय राहुल पाटील सर यांनी केले तर शिक्षक मनोगत विजय पाटील सर व अंबादास पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन शिवाजी पाटील सर यांनी केले व आभार सचिन पाटील सर यांनी मानले या कार्यक्रमाला सचिन कचरे सर व देवानंद उन्हाळे सर उपस्थित होते व इतर कर्मचारी यांनी मदत केली वंदे मातरम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

ताजा खबरें