सरकारचा नवा निर्णय; 11वी-12वीच्या अभ्यासक्रमात केले महत्त्वाचे बदल, बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा!

केंद्राने बुधवारी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) च्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल जाहीर केले. नवीन अभ्यासक्रम आराखडा शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. 2024 च्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी त्याप्रमाणेच पाठ्यपुस्तके विकसित केली जातील असंही सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे की इयत्ता 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्यापैकी किमान एक हिंदुस्थानी भाषा असणं आवश्यक आहे.

मंत्रालयानं असंही म्हटलं आहे की बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, त्यात विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल.

ताजा खबरें