आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबांना शासनातर्फे मदतीचा हात

आपदग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : ना. गुलाबराव पाटील

नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आपदग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ लाखाचे धनादेश वाटप

जळगाव – कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळातही आपादग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. आपल्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना, नैसर्गिक आपत्तीत मयत व्यक्तींच्या वारसांना व नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्याना मदतीचा धनादेश शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे प्रदान करण्यात आला. तसेच पशुहानी झालेल्या ६ व्यक्तीना शासकीय अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.

यांना वाटप करण्यात आला धनादेश

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांचे वारस सोनाली रविंद्र पाटील (नशिराबाद), कल्पना अरुण पाटील (देव्हारी),तसेच नैसर्गिक आपत्तीत मयत व्यक्तींचे वारस श्रीमती कुसुम ज्ञानदेव पाटील (आसोदा), प्रितम चंद्रकांत वाबळे (चाळीसगाव) या वारसांना प्रत्येकी ४ लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले . नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्या सविता रविंद्र नारखेडे (बेळी), यांना २ लाख ५० हजाराचा धनादेश तर पशुहानी झालेल्या तालुक्यातील रमेश विष्णू सोनवणे (सुजदे), संगिता वसंत भोई (सुभाषवाडी), अशोक नागो पाटील (ममुराबाद), श्रीराम महादू चौधरी (पाथरी), निशीगंधा सुहास नेमाडे (मोहाडी), राजेश प्रकाश पाटील (वावडदे) या ६ पात्र धारकांना पशुधन खरेदीसाठी २ लाख ३१ हजार २०० असे एकूण १५ लाखाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अव्वल कारकून सुभाष तायडे यांनी केले. प्रास्ताविक तहसिलदार तथा प्रोबेशनरी भाप्रसे अर्पित चव्हाण, तहसीलदार यांनी केले तर आभार महसूल सहायक रेखा राठोड यांनी मानले. सद रधनादेश वाटप प्रसंगी जळगाव तहसिलदार तथा प्रोबेशनरी भाप्रसे अर्पित चव्हाण, अव्वल कारकून सुभाष तायडे, महसूल सहायक श्रीमती रेखा राठोड, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरीता ताई कोल्हे – माळी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, जितेंद्र पाटील, स्वप्नील परदेशी , माजी सभापती नंदलाल पाटील, आशुतोष पाटील, उपतालुका प्रमुख राजू पाटील, अर्जुन पाटील, उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh