प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथे झालेल्या विनोद कोळी खून प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता २२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नुकताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत कुऱ्हा पानाचे औट पोष्ट च्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी २४ तासात कुऱ्हा पानाचे येथील रखवालदाराच्या खूनाचा उलगडा केला होता त्यामुळे कुऱ्हा पानाचे औट पोष्ट च्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले जात असताना दुसऱ्याच दिवशी गोजोरे येथील खून प्रकरण घडले होते.
या प्रकरणी प्रमोद गंभीर कोळी यांनी फिर्याद दाखल केली होती. यात समाधान उर्फ रामलाल प्रभाकर कोळी व जितेंद्र प्रभाकर कोळी यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीएनएस नं. ०३०/२०२४ भा.दं.वि.३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो नि बबनराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि पूजा अंधारे तपास करीत असून या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे . आरोपींना अटक करण्यासाठी एपीआय अमोल पवार, ए एस आय विठ्ठल फुसे, प्रेमचंद सपकाळे , जगदीश भोई, कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे बीट हवालदार युनूस शेख, दिपक जाधव, राहूल महाजन, उमेश बारी, कैलास बाविस्कर व पोलीस कर्मचारी यांनी प्रयत्न केले. गोजोरे गावात कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस पाटील विनोद सपकाळे, सरपंच पती लक्ष्मण कोळी व गावातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.