गोजोरेकरांना पाटशेरी नाल्याची सफाई होऊन शुद्ध पाणी मिळणार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी जवळ कुऱ्हा पानाचे रस्त्यावर असलेल्या पाटशेरी नाल्यात विहिरी जवळ घाण पाणी साचलेले असते. आणि हे घाण दूषित पाणी विहिरीत पाझरते त्यामुळे विहिरीचे शुद्ध पाणी दूषित होते. आणि हेच पाणी नळांना आल्यावर गावातील ग्रामस्थ आजारी पडतात. विशेष म्हणजे लहान बालकांना त्रास होतो. त्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळ असलेल्या या नाल्यात पाणी थांबू नये अशा तक्रारी ग्रामस्थांच्या होत्या. त्यामुळे नवनिर्वाचित सरपंच पती लक्ष्मण कोळी या बाबत पुढाकार घेत गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा यासाठी त्या विहिरी जवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आणि लवकरात लवकर या दूषित घाण पाणी साचलेल्या खड्यात डबर, मुरुम टाकून खड्डे बुजवून या पाटशेरी नाल्यात विहिरी जवळ पाणी साचणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले आहे. गोजोरे गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जातील.

jalgaonsandesh

jalgaonsandesh