२००० रुपयांची नोट द्या अन् २१०० रुपयांचे सामान घेऊन जा, दुकानदाराच्या ‘या’ ऑफरने नेटकऱ्यांना घातली भुरळ

रीझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांची तसेच दुकानदारांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. पण या अडचणीच्या काळातही काही लोक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत.

२००० रुपयांची नोट पाहून बहुतेक दुकानदार चिंतेत असतानाच दिल्लीतील एका दुकानदाराने २००० रुपयांची नोट देऊन २१०० रुपयांच्या वस्तू आपल्या दुकानातून नेण्याची ऑफर दिली आहे. संकटातही व्यवसाय वाढवण्याची संधी पाहणाऱ्या दुकानदाराच्या या ऑफरने संपूर्ण इंटरनेट जगताला हादरवून सोडले आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्यक्तीचे कौतुक करताना दिसत आहे.

सुमित अग्रवाल नावाच्या एका ट्विटर यूजरने त्याच्या अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका दुकानाच्या काचेवर हाताने लिहिलेल्या पोस्टरचा आहे. त्यावर ‘२००० रुपयांची नोट द्या आणि २१०० रुपयांचे सामान घेऊन जा’, असे लिहिले आहे. याबरोबरच त्यावर दोन हजारांच्या दोन नोटाही चिकटवण्यात आल्या आहेत. हा फोटो शेअर करताना सुमित अग्रवालने लिहिले की, “जर तुम्हाला RBI स्मार्ट वाटत असेल तर पुन्हा विचार करा, कारण दिल्लीवासी त्यापेक्षा हुशार आहेत. तुमची विक्री वाढवण्यासाठी एक उत्तम कल्पना आहे.

युजर्स बोलले या माणसाला २१ तोफांची सलामी

सुमित अग्रवालची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ट्विटर यूजर्स यावर भरभरून कमेंट्स करीत आहेत. सुमित अग्रवालची ही पोस्ट आतापर्यंत १७३ हजार लोकांनी पाहिली आहे. काही जण ऑफर देणाऱ्या दुकानदाराला अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत, तर काही जण याला आपत्तीतील संधी असल्याचं सांगत आहेत. हितेंद्र नावाच्या युजरने लिहिले की, “संधीचा फायदा करून घेणे ही व्यावसायिक भावना आहे.” तर प्रशांत नावाच्या युजर्सने लिहिले, “आपत्तीमध्ये संधी पाहत आहे.” तर दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “विक्री वाढवण्यासाठी उत्तम मोहीम आहे.”

३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येतील

RBI ने २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. २००० रुपयांच्या नोटा तात्काळ प्रभावाने बेकायदेशीर झाल्या नाहीत ही दिलासादायक बाब आहे. परंतु ज्यांच्याकडे २००० रुपयांच्या नोटा आहेत ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलू शकतात. याचा अर्थ असा की, तुम्ही देखील २००० रुपयांची नोट बदलू शकता किंवा सुमारे ४ महिन्यांसाठी तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. २००० च्या नोटा बदलून बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जमा केल्या जात आहेत.

ताजा खबरें