गौतमी पाटील; ‘तिने 3 गाण्यांचे 3 लाख घेतले आणि आम्ही…’, इंदुरीकर महाराजांनी घेतला खास शैलीत समाचार

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिची तिच्या डान्समुळे सगळ्या महाराष्ट्रात क्रेझ आहे. आपल्या अदांनी तरुणाईला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील हिचा डान्स पाहण्यासाठी तुफान गर्दी होताना दिसतेय. वाढदिवसापासून ते लग्नाच्या कार्यक्रमाच्याही सुपाऱ्या तिला मिळत आहे. आक्षेपार्ह डान्समुळे तिला विरोधही होत आहे. लावणी कलावंत आणि संघटनांनी तिच्यावर बंदी घालण्याचीही मागणी केली. यात आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचीही भर पडली आहे. इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

गौतमी पाटील हिचे उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर इंदुरीकर महाराज यांनी बोचरी टीका केली आहे. गौतमीच्या तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते, पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असे ते म्हणाले. बीडमधील आष्टी तालुक्यातील तवलवाडी या गावात इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आपल्या खास शैलीत त्यांनी गौतमी पाटील हिचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला.

‘तिने (गौतमी पाटीलने) 3 गाणी वाजवली आणि 3 लाख रुपये घेतले. तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहींचे गुडघेही फुटले, पण तिच्याविषयी काही बोलले जात नाही आणि आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षण देखील दिले जात नाही’, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

गौतमी पाटील कोण आहे?

26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखले जाते. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. इतकेच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवले जाते आणि त्यासाठी तिला भरभक्कम मानधनही दिले जाते. गेल्या काही महिन्यात तिची क्रेझ जास्तच वाढली आहेत. अनेकदा तिच्या कार्यक्रमावेळी गर्दीमुळे राडा झाल्याचेही समोर आले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh