गॅस सिलेंडरच्या किमतीत इतक्या रुपयांनी घट वाचा सविस्तर

नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर ९९ रुपये ७५ पैशांनी कमी केले आहेत.

दुसरीकडे, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत, ते जुन्या दरांतच उपलब्ध आहेत. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कधी कपात होईल, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

राजधानी दिल्लीत १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १,६८० रुपये आहे. एएनआयने यासंदर्भात ट्विट केल आहे.