भादली बु|| येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भादली बुद्रूक येथे सरपंच मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची सभा श्रीराम मंदिर चौकात घेण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रमुख पाहुणे नशिराबाद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे साहेब हे होते. यावेळी मनुरे साहेब म्हणाले की गणेशोत्सवात शासनाची नियमावलीचे पालन करून कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी आणि गणेशोत्सव आनंदात पार पाडावा, डी. जे. वगैरे न लावता त्या पैशाचा उपयोग वाचनालयासाठी व चांगल्या कार्यासाठी लावा असे आवाहन गणेश उत्सवाच्या मंडळांना केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला,यावेळी बालगोपालांसह तरुण मित्र मंडळ , वृद्ध ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोऊनि अलिअर खान, गुप्तवार्ता विभाग प्रमोद पाटील, पोकाँ नितीनभालेराव, पोकाँ गणेश गायकवाड, पोकाँ प्रवीण लोहार तसेच माजी सरपंच मिलिंद चौधरी, माजी सरपंच जितेंद्र नारखेडे, माजी उपसरपंच संदीप कोळी. ग्रामपंचायत सदस्य अरुण सपकाळे गणेश मंडळाचे प्रतिनिधी कौस्तुभ झांबरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ह भ प गोपाळ ढाके यांनी केले. गणेश उत्सव सालाबाद प्रमाणे शांततेत आनंदित पार पाडा असे आवाहन करण्यात आले तसेच गावाच्या वतीने पोलीस पाटील एँडवोकेट राधिका ढाके यांनी आभार मानले.

ताजा खबरें