गलंगी बसस्टँडवरील बजाज कंपनीचा शोरूम फोडला ; बजाज प्लसर दुचाकीची चोरी : अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

हेमकांत गायकवाड

गलंगी/चोपडा : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावरील गलंगी (ता.

चोपडा) येथे बसस्टँडवर बजाज कंपनीच्या नवीन
दुचाकी विक्रीचे मयंक मोटर्स शोरूमच्या छताचा
पत्राचा हुक तोडून दुकानात प्रवेश करून दुकाना च्या शटरची लॉकपट्टी लोखंडी टॉमीने तोडून शोरूम मध्ये विक्रीसाठी असलेली बजाज कंपनी ची प्लसर -१२५ सीसी हॉर्सपॉवरची नवी दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज दि.२६ ऑक्टोबर बुधवार रोजी पहाटे १ :२० ते २ : ३० वाजता घडली.शोरूम फोडून दुचाकीची चोरी करतांना तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. चोरीच्या घटनेने गलंगी परिसरात प्रचंड खडबळ उडाली आहे.बसस्टँडवर गेल्या सहा महिन्यात तिसऱ्यांदा दुकान फोडल्याची घटना घडली आहे.
कोळंबा (ता.चोपडा) येथील रहिवाशी प्रदीप
धनसिंग बाविस्कर (वय-३१) यांचे अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर चोपडा-शिरपूर रस्त्यावर
गलंगी बसस्टँडवर मयंक मोटर्स नावाचा बजाज
कंपनीचा दुचाकी विक्रीचा शोरूम आहे.दरम्यान
दि.२६ ऑक्टोबर बुधवार रोजी पहाटे १ :२० ते २ : ३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी
शोरूमच्या छताच्या पत्राचा हुक तोडून दुकानात अनधिकृत प्रवेश करून दुकानाच्या शटरची लॉकपट्टी लोखंडी टॉमीने तोडून शटर उघडून शोरूम मध्ये विक्रीसाठी असलेली बजाज कंपनी ची ८५,२९९/- रुपये किंमतीची प्लसर मॉडेलची १२५ सीसी हॉर्सपॉवरची नवी दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.विशेष म्हणजे मयंक मोटर्स शोरूम फोडून दुकानात दुचाकीची चोरी करतांना तोंडाला रुमाल बांधलेले साधारण २० ते २५ वर्षे वयाचे दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.त्यानंतर बीट अंमलदार पो.हे.कॉ.राजू महाजन,पो.कॉ. सुनील कोळी यांनी पंचनामा करून चोरट्यांची माहिती घेतली.याबाबत मयंक मोटर्सचे मालक प्रदीप धनसिंग बाविस्कर (वय-३१) रा. कोळंबा (ता. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरनं.२०१/२०२१ भादवि कलम-४६१, ३८० व ३४ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.लीलाधर भोई व सुनिल कोळी करीत आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh