या तारखेपासून कापसाचे भाव जाणार अकरा हजार रुपये च्या पार

देशातील शेतमाल बाजारामध्ये आता कापसाची चर्चा जास्त राहते. पण गुरुवारी तुटलेला बाजार शुक्रवारी स्थिर राहिला. व आज काही ठिकाणी बाजारात चांगली सुधारणा पाहायला मिळाली. तर फेब्रुवारीचे वायदे अद्यापही सुरू झालेले नाहीत.

मग वायदे नसल्याचा परिणाम बाजार समिती ला होईल का? सध्या कापसाला काय दर मिळतोय. कापसाचे दर कधी वाढतील. याची माहिती जाणून घेऊ.

चालू आठवड्यात कापसाचा बाजार तुटला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे वायदे कारणीभूत होते.मात्र शुक्रवारी कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा होऊन बाजार बंद झाला होता.

पण दुसरीकडे वायदे कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष खरेदीतील दर ज्या प्रमाणात पाडले होते.त्या प्रमाणात वायदे वाढल्यानंतर सुधारणा झाली नाही. म्हणजे वायद्यांच्या आडून व्यापारी आणि कापड उद्योगांनी आपला मनसुबा पूर्ण केला असंच म्हणावं लागेल. त्याला बाजारातील संभ्रम ही कारणीभूत होते.

जर समित्यांमधील दरात काही ठिकाणी क्विंटल मध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ दिसून आली. आज कापसाला सरासरी 8 हजार रुपये ते 8 हजार दोनशे रुपये दर मिळाला होता.

ज्या शेतकर्यांना आर्थिक अडचण आहे असे शेतकरी कापूस विकत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी दर वाजे बंद केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र आज कापसाचे वायदे नरमले होते कापसाचे व्यवहार 84.19 पार पडले.पंधरा हजार चारशे पन्नास रुपये किंव्टल होतो. मात्र पुढील महिन्यात कापसाचे दर वाढू शकतात.

असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी म्हटले आहे. देशातील वायदेबाजारात अर्थात एमसीएक्स वर कापसाचे फेब्रुवारी आणि त्यापुढील वायदे अद्यापही खुले झालेले नाहीत. कापसाच्या वायद्यांबाबत सध्या अंदाज व्यक्त केले जात आहे.तर काही जणांच्या मध्ये फेब्रुवारी च्या शेवटपर्यंत भाव येऊ शकतात. वायदे नसताना कापसाचे जर खरच कमी भाव राहतात का त्याचे चाचणी सरकार करत असल्याचे काही जणांचं म्हणणं आहे.पण सरकारने कापसाच्या वायदे विषयी अजूनही कोणती अधिकारी भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे आपण वाट पाहणारे प्रत्यक्ष खरेदी विक्री ही नगण्य असते. वायदे मुख्यता त्यांचे प्लॅटफॉर्म आहे. आयातदार निर्यात दर व्यापारी आणि उद्योग आपली जोखीम करण्यासाठी वायदांचा आधार घेत असतात.

jalgaonsandesh

jalgaonsandesh