घरकुल घोटाळा प्रकरणात; माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालानी ,सदाशिव ढेकळे ,भोईटे अपात्र

जळगाव – घरकुल घोटाळा प्रकरणात जळगाव शहर महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्तांनी दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी आदेश काढले आहेत.

घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. धुळे विशेष न्यायालयाने दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ही शिक्षा सुनावली असता त्यावेळी त्यामध्ये जळगाव महापालिकेच्या ५ विद्यमान नगरसेवकांचा सामावेश होता.

याप्रकरणी मनपा प्रशासनाने निवडणुक आयोगासह राज्यशासनाला त्याबाबत माहिती सादर केली होती. त्यानंतर राज्य शासनाने व निवडणुक आयोगाने पाठविलेल्या पत्रानुसार व धुळे न्यायालयाचा निकाल आणि जळगाव न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ४ नगरसेवकांना अपात्र करण्याचे आदेश काढले. या आदेशात धुळे न्यायालयाने दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निकालापासून ६ वर्षांसाठी भगत
रावलमल बालाणी, सदाशिव गणपत ढेकळे, लताबाई रंणजित भाईटे व स्विकृत नगरसेवक कैलास नारायण सोनवणे यांना अपात्र करण्यात आले असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे सदर नगरसेवकांना दि. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत निवडणूक लढविता येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

धुळे विशेष न्यायालयाने दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी घरकुल घोटाळा प्रकरणी मनपाच्या ५ विद्यमान नगरसेवकांना शिक्षा सुनावली होती. सदर पाच नगरसेवकांपैकी नगरसेवक दत्तू सावकारे यांना न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे त्यांना वगळून चार नगरसेवकांना अपात्र करण्याचा निकाल जळगाव न्यायालयाने दिला होता.

jalgaonsandesh

jalgaonsandesh