प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथील ग्रामपंचायत कार्यालयात १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सरपंच काजल भोजराज कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपसरपंच एकनाथ सपकाळे, सदस्य रामचंद्र मिस्तरी, रत्नमाला पाटील, सुनिल कंखरे, पोलीस पाटील खुशाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते भोजराज कोळी, दिनकर पाटील, युवराज पाटील, परिचारक महेश भारुडे, ग्रामसेविका प्रतिभा तायडे व कर्मचारी सचिन शिरोळे, राहुल कोळी, पंकज पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.