जळगाव येथे २६ जूनपासून पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन

जळगाव – यंदाचे २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रिशती वर्ष असून त्‍यानिमित्‍ताने २६ ते २९ जून दरम्यान जळगाव येथे विश्वातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

अध्‍यक्षपद धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज नावाने परिचित असलेले ‘शककर्ते शिवराय’ या विश्व प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख भूषविणार आहेत.

जळगाव येथे २६ जूनपासून पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रिशती वर्ष

जळगाव येथे २६ ते २९ जून दरम्यान विश्वातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन

विजयराव देशमुख भूषविणार अध्यक्षपद

चार दशकांपासून शिवचरित्राचे गाढे अभ्‍यासक व वक्‍ते असलेले शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी शिवचरित्राशी निगडीत असलेल्‍या शेकडो साधनांचे मूलग्राही अध्‍ययन केले असून त्‍यांनी ‘शककर्ते शिवराय’ हा द्विखंडात्‍मक शिवचरित्र लिहिलेले आहे.

शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे, या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या हस्‍ते होणार असून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या गादीचे वारस श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिवकाळातील छत्रपती शिवरायांचे सोबत असणारे ७५ सरदार घराण्यांचे वारसदार तसेच, शिवप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहणार आहेत. यानिमित्ताने नाणे संग्रह, शस्‍त्रप्रदर्शन, पगडी प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, वीरगळ व आरमार प्रदर्शनासोबत गोंधळ, जागरण, पोवाडा, शिवकालीन कलांचे सादरीकरण, संत साहित्‍य, शिवछत्रपतींचा राज्‍याभिषेक आदी विषयांवर परिसंवाद, मुलाखती, अभ्‍याससत्र असे भरगच्‍च कार्यक्रम होणार आहेत.

तरी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख, नियंत्रक रवींद्र पाटील (पाचोरा), इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे (यावल) यांनी केले आहे

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला