सुनसगावात जिवनज्योती महिला ग्राम संघ व बचतगटाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांचा सत्कार 

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री क्षेत्र मनुदेवी मंदीराच्या प्रांगणात ग्राम संघ व बचत गट यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व प्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नवनिर्वाचित लोकनियुक्त काजल कोळी व सदस्य तसेच मान्यवर पदाधिकारी यांनी केले. स्वागतगीत वर्धीनी संगीता सपकाळे व सहकारी महिलांनी सादर केले. त्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सभापती, पोलीस पाटील, तलाठी , ग्रामसेविका, पत्रकार, तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार महिला बचत गटाच्या सदस्यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना तलाठी सरला वळवी यांनी महिलां कोणत्याही कामाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पत्रकार जितेंद्र काटे यांनी महिला सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देऊन बचत गटातील महिला शिक्षित झाली पाहिजे असे सांगून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर राहूल ठोसरे ( बी एम भुसावळ ) यांनी विविध प्रकारच्या योजना बाबत माहिती देत येथील ग्रामसंघ व बचतगटाच्या कार्याचे कौतुक केले तर सुशिल साहेब यांनी आय एफ सी बाबत माहिती दिली आणि आकाश लोखंडे यांनी बचतगटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात असे सांगितले . यावेळी तालुका पातळीवरील (सी सी) प्रियंका पाटील, प्रिया वाडेकर यांची उपस्थिती होती तसेच सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुनंदा कंकरे, उज्वला कंकरे, प्रतिभा पाटील यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्धीनी संगीता सपकाळे, सीआरपी प्रतिभा पाटील, सीआरपी उज्वला कंकरे, जिवनज्योती ग्रामसंघ अध्यक्ष संगीता काटे, उपाध्यक्ष सुनिता कंकरे , लिपिक सुनंदा कंकरे, पशुसखी निशा पाटील तसेच सर्व ग्रामसंघाच्या पदाधिकारी व बचतगटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी तसेच दिव्यांग बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मंदीरातील सेवेकरी मंडळी यांनी घेतले.यावेळी गावातील ४० बचत गटाच्या महिलांची उपस्थिती होती.

jalgaonsandesh

jalgaonsandesh