शेतकऱ्यांची दिवाळी, लवकर मिळणार सरकारच्या या योजनेचा लाभ..

देशातील शेतकर्यांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळतो. राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात.

यातील एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा 15 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. जाणून घ्या या योजनेबद्दल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेद्वारे, लाभार्थ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचे हप्ते वर्षातून तीन वेळा म्हणजेच एकूण 6,000 रुपये वार्षिक दिले जातात. यातिलाच आता 15 वा हप्ता लवकर जारी केला जाणार आहे.

जर तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची लॅण्ड सीडिंग आणि आधार सीडिंग सारखी कामे पूर्ण असणे महत्वाचे आहे. नाहीतर तुमचा हप्ता अडकू ही राहू शकतो.

दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी देखील महत्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही. यामुळे लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. हे काम तुम्ही जवळच्या CSC केंद्रातून, बँकेतून किंवा pmkisan.gov.in या शेतकरी पोर्टलवरून सहज करू शकता.

हप्ता कधी येऊ शकतो?

या योजनेचा 14 वा हप्ता हा 27 जुलै रोजी जारी करण्यात आला होता. मात्र या योजनेचा पुढील हफ्ता कधी जारी होईल याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. दरम्यान, या योजनेचा पुढील हफ्ता हा दिवाळीपर्यंत मिळू शकतो अशी माहिती मीडियाद्वारे समोर आली आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh