शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – शेतकरी भोळा, सरकार बरोबर सहकारात ही होतो आहे वेडा. अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचे कारण ही तसेच आहे शेतकरी दरवर्षी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेकडून कर्ज घेत असतात. ही साखळी १ एप्रिल ते ३१ मार्च अशी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना ३१ मार्च ला कर्ज भरणा करणे आवश्यक असते अन्यथा थकबाकीदार म्हणून शिक्का शेतकऱ्यांच्या कपाळावर बसतो त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने कर्ज काढून कर्ज भरावे लागते. विशेष म्हणजे आधी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्ज मिळत होते मात्र यावर्षी एप्रिल संपत आला तरी हातात कर्जाची रक्कम मिळाली नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी एक महिन्यासाठी व्याजाने कर्ज काढून सोसायटी कर्ज भरले आहे.

त्या शेतकऱ्यांना आता दोन महिन्याच्या व्याजाची रक्कम समोरच्याला द्यावी लागणार आहे. शेतकरी सोसायटी कार्यालयात जाऊन चौकशी करतात तर त्यांना योग्य उत्तर मिळत नाही त्यामुळे शेतकरी वैतागले असून चेअरमन व संचालक मंडळाने तरी लक्ष घालून आपल्या सोसायटीच्या सभासदांना लवकरात लवकर कर्ज रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी करीत आहेत. सुनसगाव विकासोच्या चेअरमन सुदाम भोळे यांना विचारले असता मंगळवारी किंवा बुधवारी वाटप होणार असल्याचे सांगितले आहे.

ताजा खबरें