मोंढाळा येथे आत्मा अंतर्गत शेतीशाळा मार्गदर्शन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील मौजे मोंढाळा ता. भुसावळ येथे दि.१९ जुलै रोजी आत्मा योजनेतंर्गत कापूस शेतीशाळेच्या दुस-या क्लासचे आयोजन करण्यात आले होते, शेतीशाळेत अंबाडी बाॅर्डर (सापळा) पिक व आंतरपिक मुग/ उडीद/ तूर लागवडीचे फायदे स्पष्ट करून त्याचे प्रात्यक्षिक तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी करून दाखविले तसेच प्रक्षेत्रावर कापूस रोपांची गळ फांदी व फळ फांदी यांची ओळख करून देऊन गळ फांदी काढणीचे व मुख्य शेंडा छाटणीचे प्रात्यक्षिक देखील करून दाखविले.

कृषि सहाय्यक श्री मानसिंग भोळे यांनी शेतीशाळेची उपयोगिता सांगून फळबाग लागवड व पिक विमा काढणीचे फायदे स्पष्ट केले, तसेच PM Kisan योजनेचे फार्म online करून जमा करण्यास सांगितले. यावेळी मोढाळे गावातील 25 ते 28 शेतकरी गटाचे शेतकरी उपस्थित होते, शेतीशाळेचे आयोजन करण्यासाठी श्री सुनिल पाटील व श्री संतोष डोलसे यांनी परिश्रम घेतले .