खोटा मृत्यू दाखला अन् वारस नसल्याचे भासवून फसवणूक

यावल : शहरातील एका व्यक्तीची तब्बल 20 वर्षानंतर मृत्यूची नोंद केली. त्यास मुली नाही, असे भासवून 11 जणांनी फसवणूक केली. खोटे दस्तऐवज सादर करत चार मिळकतीवर स्वत: वारस असल्याची नोंद केली. तब्बल 11 वर्षानंतर उघडकीस आलेल्या या प्रकारात एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

यावल पोलिसात गुन्हा

सायराबी शेख उस्मान (रा.डांगपुरा, यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयीत शेख गुलाम नबी शेख गुलाम रसूल मोमीन, अ.नबी शेख गुलाम रसूल मोमीन, गुलाम दस्तगीर शेख गुलाम रसूल मोमीन, शेख रईस शेख गुलाम रसूल मोमीन, शेख शकील शेख गुलाम रसूल मोमीन, शेख सईद शेख गुलाम रसूल मोमीन, शेख जावेद गुलाम रसूल मोमीन, सै. इफ्तेखार सै. लियाकत, शेख मोहंमद हुसेन शेख अकबर, शेख कलीम शेख याकूब व शेख आरिफ शेख सिकंदर (सर्व रा.डांगपुरा, ता.यावल) या 11 जणांनी त्यांचे वडील शेख कादर शेख अहमद मोमीन यांच्या मृत्यूची 20 वर्षांनंतर 1 डिसेंबर 2010 रोजी मृत्यू झाल्याची खोटी नोंद पालिकेकडे 7 डिसेंबर 2010 रोजी केली. फिर्यादी व तिच्या बहिणी अशा हयात असताना मृत शेख कादर मोमीन यांना मुली नाहीत, असे खोटे दर्शवून आपणच त्यांचे वारस असल्याचे भासवले. मृताच्या सिटी सर्वे क्रमांक 3161, 3196, 3197 व 3198 या सर्व मिळकतीवर 1 ते 7 जणांनी वारस म्हणून 21 फेब्रुवारी 2011 रोजी स्वत:ची नावे लावली. फिर्यादीची संगनमताने फसवणूक केली. याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे.

मिळकतींच्या पडताळणीत उघड झाला प्रकार

संबंधित मिळकती कधी-काळी आपल्या आई-वडिलांच्या होत्या. त्यांचा व्यवहार कधी झाला? याच्या पडताळणीसाठी फिर्यादीचा मुलगा शेख अख्तर शेख उस्मान याने 17 ऑगस्ट 2021 रोजी फेरफार नोंदी काढल्या. त्यात 11 वर्षांपूर्वी घडलेला प्रकार उघडकीस आला. संपूर्ण कागदपत्रांची खरी नक्कल मिळवून यावल पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh