शिंदे सरकारचा आणखी मोठा निर्णय, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मुदत ही गेल्या 31 ऑगस्टला संपूष्ठात आली होती. त्यानंतर ज्या महिलांनी अद्यापही या योजनेत अर्ज केले नाहीयेत. त्यांना योजनेला आणि निधीला मुकावं लागणार? असा प्रश्न महिलांना पडला होता.मात्र या महिलांना आता सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत ही महिन्याभरासाठी वाढवली आहे. या संदर्भातला जीआरही समोर आला आहे.त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरं तर लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरूवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेच अर्ज करण्याची मूदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. आता ही मुदत देखील संपली होती. त्यात अनेक महिलांना अद्याप या योजनेत अर्जच करता आला नव्हता. अनेकांचे अर्ज देखील रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने आला लाडकी बहीण योजनेला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महिलांना आता 30 तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘त्या’ महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार? 

आता ज्या महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता आले नाही आहेत. त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्यातही अर्ज करता येणार आहेत. तसेय या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून महिलांच्या खात्यात 4500 जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मग 3000 कुणाच्या खात्यात जाणार? 

ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत. त्या महिलांचे अर्ज मंजूर झाल्यास त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे 3000 रूपये जमा होणार आहेत. या संदर्भात निधी हस्तातरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत.

दरम्यान आतापर्यंत 2 कोटी 40 लाखांपर्यंत अर्ज करण्यात आले असून, राज्यातील महिला वर्ग योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी सरकारची धारणा आहे. राज्याच्या महिला आणि बालविकस विभागाने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली आणि 17 ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे प्रत्येकी दीड हजार रुपयाप्रमाणे तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली.

2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.