सुनसगाव मतदान केंद्रावर हिरकणी व बाल संगोपन कक्ष स्थापन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदानाची तयारी जवळपास झाली असून मतदान केंद्रावर शासनाच्या सुचनेनुसार वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार असून आरोग्य विभाग व अंगणवाडी विभागाला सुध्दा आता मतदान केंद्रावर थांबावे लागणार आहे.

शासनाच्या सुचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे तसेच एखाद्या मतदाराला मतदान केंद्रावर काही शारीरिक त्रास झाला तर आरोग्य सुविधा कक्षाच्या माध्यमातून त्या मतदारांवर प्राथमिक उपचार करण्यात येणार आहे यासाठी उपकेंद्राचे सीएचओ व आशा सेविका या कामी मदत करणार आहेत तसेच ज्या महिला मतदार यांच्या जवळ लहान बाळ असेल त्यांच्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बाल संगोपन कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

सुनसगाव येथील मतदान केंद्रावर दोन मतदान केंद्र असून या ठिकाणी हिरकणी कक्ष व आरोग्य सुविधा कक्ष तसेच बालसंगोपन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या मतदान केंद्राला डॉ पांढरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ संगीता दवंगे तसेच वराडसिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल भंगाळे तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका संध्या रोझतकर यांनी भेट दिली व पाहणी समाधान व्यक्त केले तसेच सुचना दिल्या.

यावेळी सुनसगाव उपकेंद्राचे सीएचओ डॉ रुपेश पाटील, आरोग्य सेवक संजय कोळी, आरोग्य सेविका विजया पाटील, आशा सेविका ज्योती पाटील, सुनिता काटे व मदतनीस शकुंतला पाटील तसेच अंगणवाडी सेविका चारुलता बेंडाळे, संगीता धनगर, पल्लवी बाविस्कर आणि मदतनीस शोभा चौधरी, आशा चौधरी व मोहिनी पाटील उपस्थित होते. मतदान केंद्रांवरील हिरकणी कक्ष, आरोग्य सुविधा कक्ष व बालसंगोपन कक्ष यांचा लाभ मतदारांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.