एरंडोल तालुक्यातील घटना : खेळताना पाय घसरून पाच वर्षीय चिमुकला खदानीत बुडाला 

एरंडोल –  तालुक्यातील एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलीय. आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडलीय.

रोहित विकास पठाण (वय ३, रा. सावदे ता.एरंडोल) असं मृत चिमुकल्याचे नाव असून या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एरंडोल तालुक्यातील सावदे येथे विकास सुपडू पठाण हे पत्नी मोनी व ३ वर्षाचा मुलगा रोहित यांच्यासह राहतात. रोहित हा गावातील बालवाडी येथे शिकण्यास जात असतो. नेहमीप्रमाणे सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी पठाण हे शेताच्या कामाला निघून गेले होते. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोहित हा त्याची आई मोनीबाई तिच्यासोबत खदानीवर कपडे धुण्यासाठी गेला होता तेथे खेळत असताना अचानक त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला.

गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून काही पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य साळुंके यांनी त्याला मयत घोषीत केले. रोहित हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता. याबाबत पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh