ममुराबाद येथे उत्साह : युवक-युवतींचा मोठय़ा संख्येने सहभाग, चैतन्याचे वातावरण
ममुराबाद गावी नवरात्रोत्सवानिमित्त प्रथमच दुर्गा दौड कार्यक्रम घेण्यात आला़ यासाठी पहाटे मोठय़ा संख्येने भाविक सहभागी होऊन मातेचे दर्शन घेत आहेत़ मातेचा जय जयकाराने सध्या गावातील धार्मिक वातावरण ढवळून निघाले आह़े गावात नवरात्रोत्सवाची मोठी धामधूम सुरु आह़े जिकडे तिकडे रास, गरबा, दांडीया रंगताना दिसून येत आहेत़ गावात विविध ठिकाणी दुर्गादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आह़े यंदा प्रथमच श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर गावी दुर्गा दौड हा धार्मिक कार्यक्रम राबवला जात आह़े


या कार्यक्रमास गावातील सर्वभागातील मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आह़े या दौडमध्ये मातेच्या दर्शनासाठी मोठय़ा संख्येने भाविक सहभागी होत आहेत़ पहिल्या माळेपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली आह़े पहिल्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी चौकातुन दौड सुरु झाली़
पहाटे साडेपाच वाजेला दुर्गा दौडला सुरुवात केली गेली़ संपूर्ण गावातून हातात भगवे झेंडे, मशाल घेऊन मातेच्या जय जयकाराने भाविक दौड लावत असतात़ ठिकठिकाणी या दौडचे स्वागतही सुवासिनी करीत आहेत़ विशेषत: तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने या दौडमध्ये सहभागी होत आहेत़ दररोज एक-एक मंडळाकडून या दौडीचे आयोजन केले जात आहे.
संपूर्ण गावात दौड संपल्यानंतर पुन्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दौडचा समारोप करण्यात येतो.
दुर्गामाता दौडमुळे गावातील धार्मिक वातावरण एका वेगळया उंचीवर गेले आह़े या कार्यक्रमात गावातील लाहान थोर असे शेकडो भाविक उपस्थित होत़े.
दुर्गादौडसाठी शिवप्रतिष्ठानचे निखील पाटील, सुरज पाटील, राहुल पाटील, कृष्णा पाटील, श्रीराम भक्त किरण पाटील, निंबा पाटील,यानी परिश्रम घेतल़े .