एलॉन मस्क आता बदवणार ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड Logo; त्याऐवजी ठेवलाय Doge Meme, युजर्स हैराण

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे त्यांच्या आश्चर्यकारक निर्णयांसाठी ओळखले जातात.

ट्विटरची मालकी घेतल्यापासूनच मस्क त्यांच्या झटपट आणि भन्नाट निर्णयांमुळे कायमच चर्चेत असतात. अशातच आता नव्या निर्णयामुळे एलॉन मस्क चर्चेत आहेत. आज पहाटे जर तुम्ही ट्विटर ओपन केलं असेल तर तुम्हाला ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला असेल. यावेळी एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड  हटवलाय. पहाटेपासून ट्विटर सुरू करणाऱ्या अनेक युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Doge चा फोटो दिसत होता. जरी हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.

Twitter होम बटणावर झालाय बदल

मात्र, हा बदल सध्या ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि युजर्सना सध्या ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे. ट्विटरचं होम बटण म्हणून दिसणार्या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डोगेचं चित्र दिसत आहे आणि हा बदल काही तासांपूर्वीच झाला आहे.

एलॉन मस्क यांचे मजेशीर ट्वीट

ट्विटरचा आयकॉनिक लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्क यांनी एक मजेशीर पोस्टही शेअर केली. त्यांनी आपल्या अकाउंटवर डॉगे मीम शेअर करत एक मजेशीर ट्वीटही शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात धरलं आहे. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, “ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे.”

Doge Image नक्की आहे तरी काय?

आयकॉनिक ब्लू-बर्डला हटवून एलॉन मस्क यांनी ठेवलेली Doge Image नेमकी काय आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. डॉज इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सीचं प्रतीक आणि लोगो आहे. 2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक विनोद म्हणून Doge Image लॉन्च करण्यात आलं होतं.

एलॉन मस्कनं शेअर केला जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉट

एलॉन मस्कनं त्यांच्या अकाऊंटवर एका जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एका अज्ञात अकाउंटशी चर्चा करत आहेत. यामध्ये ती व्यक्ती मस्क यांना ट्विटरच्या बर्ड लोगोच्या जागी Doge Image लावण्यास सांगत आहे. काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये ही पोस्ट शेअर करताना एलॉन मस्क यांनी लिहिलं आहे की, ‘As promised’ म्हणजेच, जे वचन दिलं ते मी पूर्ण केलं.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील