निवडणूक आयोगाच्या दणका, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या 

मुंबई –  महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.

विशेष म्हणजे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचादेखील यामध्ये समावेश आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवाडे आणि धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी शुभम गुप्ता, आएएस अधिकारी संजय मीना, अमित सैनी यांची तडकाफडकी बदली केल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यानंतंर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण या बदल्या निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर करण्यात आल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका योग्य पद्धतीने पार पडाव्यात म्हणून देशभरातील काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते.

निवडणूक आयोगाने नुकतंच देशभरातील विविध राज्यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असणाऱ्या अधिकाऱ्यांचा किंवा गृह कॅडर असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे नुकतंच निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांना हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांना मुबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तिथे सध्या पी. वेलरासू कार्यरत आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या दुसऱ्या विद्यमान अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कुणाची नियुक्ती कुठे?

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच आएएस अधिकारी संजय मीना यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त केली आहे. सध्या इथे मनोजकुमार सूर्यवंशी कार्यरत आहेत. तर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. सध्या इथे शुभम गुप्ता हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

‘या’ अधिकाऱ्यांची बदली

अमित सैनि, अभियान संचालक, जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.

संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.

राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर.

विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर.

अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.

अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर.

कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर.

अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन या पदावर.

संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर.

शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर.

पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर.

डॉ. कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला