एकनाथ शिंदे,गुलाबराव पाटील, किशोर पाटील फेल i आमदार किशोर पाटलांनी आपला गड राखण्यासाठी आजपासून सुरुवात करावी.कामाला लागावे.

जळगाव -जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गाळण चे तीन शेतकऱ्यांचे शेत भुसावळ ते मनमाड तिसऱ्या रेल्वे लाईन साठी अधिग्रहण केली.काशींनाथ पाटील यांची ३७आर जमीन रेल्वेने अधिग्रहण केली आहे.त्या जमीनीवर ३५ आंब्यांची झाडे आणि ४४ लिंबूंची झाडे आहेत.तशी तलाठीकडील पीकपाणी व कृषी सहायक कडे नोंद आहे.२०१८ची.आजही ती झाडे उभी आहेत.म्हणजे शेतकऱ्यांची मागणी खरी आहे.हक्काची आहे.

२०१८ मधे जे एम रिपोर्ट बनवला तेंव्हा कृषी सहायक ने खरी माहिती लेखी आणि नमुना स्वरूपात दिली.तेंव्हा भुमिअभिलेख चे कर्मचारी दिपक पवार यांनी त्या शेतात ३५आंबे आणि ४४ लिंबू असल्याचा उल्लेख केला.
पण जेंव्हा पुन्हा २०२२मधे जे एम रिपोर्ट त्याच दिपक पवारने बनवला तेंव्हा ते आंबे आणि लिंबू ची झाडाचा उल्लेख केला नाही.झाडांच्या कॉलममध्ये निरंक लिहून रेल्वे ला चुकीची माहिती दिली.त्यामुळे रेल्वे अधिकारी ने त्या शेतकरीला बागायत ऐवजी कोरड शेतीचा मोबदला दिला.
असे का घडले? का घडते? त्यांचे कारण आहे,भुमिअभिलेख च्या कर्मचारी ला शेतकरी कडून ख्याली खुशाली, चिरीमिरी पाहिजे.ती काशीनाथ पाटील, सचिन पाटील यांनी देण्यास टाळाटाळ केली.म्हणून जाणिवपूर्वक जे एम रिपोर्ट कोरड शेतीचा सादर केला.
जर सरकारी नोकर अशी चिरीमिरी घेऊन,लांच घेऊन काम करीत असेल आणि शेतकरी नाडला जात असेल तर किशोर पाटील आमदार असून काय उपयोग? गुलाबराव पाटील पालकमंत्री असून काय उपयोग? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून काय उपयोग? अब्दुल सत्तार कृषी मंत्री असून काय उपयोग? किशोर पाटील, गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार यांनी असेच धंदे करून गडगंज संपत्ती जमवली आहे.मुलगी टीईटी परीक्षा नापास असूनही पास कशी केली ? मंत्रीच्याच मुलीला असा अतिरिक्त,चुकीचा फायदा का? माझ्या शेतकरीच्या मुलीला,मुलाला,शेताला का नाही? ही माणसे आमदार मंत्री स्वताच्या हितासाठी काहीही काळे गोरे करतात.पण शेतकरी साठी साधा प्रामाणिकपचा सुद्धा दाखवत नाहीत.तरीही शिंदे म्हणतात,मी शेतकरी आहे.बघा मी कसा नांगर धरतो.बघा ,मी कसा धर्मवीर आहे.ही भंपकबाजी आहे ‌खोटारडेपणा आहे.शेतकऱ्यांना मुर्ख बनवण्याची कला आहे.नौटंकी आहे.
मुख्यमंत्री मुंबई हून भोकर पुलाचे उद्घाटन करण्यासाठी तापी काठावरील जळगाव जिल्ह्यातील भोकर ला आले.मोठमोठी भाषणे ठोकली.जादुगार सारखे हात वर करून.गुलाबराव पाटील तर इतके जोमात आले कि,दारू पिल्यासारखे बरडले.किशोर आप्पा तेथे हासत होते,टाळी वाजवत होते.खरे म्हणजे पुल बांधण्यासाठी निधी दिला ना! तर मग, उद्घाटन केले नसते तर पूलाचे बांधकाम झाले नसते का?असा कोणता कायदा,नियम, शिष्टाचार आहे कि, मुख्यमंत्री ने उद्घाटन करणे आवश्यक आहे?तितकाच वेळ पाचोरा तालुक्यातील गाळण घ्या शेतकरी साठी दिला असता तर ,शिंदे शेतकरी असल्याचे खरे वाटले असते.गुलाबराव शेतकरी खरे असल्याचे वाटले असते.पण हे शेतकरी नाहीतच आणि शेतकऱ्यांचे नेतेही नाहीत.हे आहेत पान टपरी वाले आणि रीक्षावाले.ठाण्याला कोणी शेतकरी नाहीतच म्हणून शिंदे निवडून येतात.पण जळगाव ग्रामीण मधे तर शेतकरी मतदार आहेत.तरीही गुलाबराव पाटील कसे काय निवडून येतात? यांना आमदार निवडून देणे ही शेतकऱ्यांची चूक आहे.किंवा गुलाबराव पाटलांची जादुगिरी ,कलाकारी आहे.आता तरी शेतकऱ्यांनी भानावर आले पाहिजे.सावध झाले पाहिजे.
पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील , पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसील,कृषी ,भुमिअभिलेख प्रशासनाचे ज्ञान नसल्याने ही माणसे तहसीलदार, प्रांताधिकारी, कलेक्टर,भुमिअभिलेख अधिक्षक,कृषी अधिकारी यांचेशी धड बोलू शकत नाहीत.साहेब,काहीतरी करा, आणि इतके नीट करा,असे मोघम बोलतात.त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांच्या हो ला हो म्हणतात आणि फाट्यावर मारतात.हा काय बिघडवून घेईल माझे? फक्त बदली करू शकतो.मॅट किंवा कोर्टात जाऊन रद्द करून आणू.जशी जळगाव महापालिका आयुक्तांनी बदली रद्द करून आणली,शिंदे आणि गुलाबरावच्या नाकावर टिच्चून.
शेतकरी बांधवांवर असे संकट,असे सुलतानी आफत का येते? कारण शेतकरी अशिक्षित आणि नालायक माणसाला आमदार खासदार झेडपी सदस्य निवडून देतात.खाऊन पिऊन किंवा पैसे घेऊन.हा असा अडाणचोट आमदार किंवा मंत्रीचे अधिकारी पुढे काहीच चालत नाही.याला कळतच नाही.कलेक्टरने, प्रांताधिकारी ने, तहसीलदार ने यांचे दोन चार ट्रॅक्टर,डंपर चालू दिले किंवा पकडून सोडले कि,कोंड्या खुष होतो.एखादे दारू दुकान चालू दिले कि नाऱ्या खुष होतो.म्हणतो, साहेब चालू द्या तुमचे जोरात.काळे चालवा कि गोरे चालवा, आम्ही बसलो आहे ना!
पाचोरा तालुक्यातील गाळण चे तीन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.आमदार किशोर पाटील ते मिळवून देण्यात फेल झाले आहेत.म्हणून शेतकऱ्यांमधे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.एका गावातील अशी बातमी कानोकानी , फोनाफोनी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना पोहचली आहे.मी जळगाव ला कानाकोपऱ्यात राहात असूनही मला कळली आहे.याचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीत किशोर पाटील यांचा पराभव ठरलेलाच आहे.याची माहिती मी स्वतः किशोर आप्पांना सर्विस्तर सांगितली आहे.त्यांनी त्यांची चूक सुधारली पाहिजे.पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री चे ते लाडके आमदार आहेत.गुवाहाटीला सोबत गेले होते.आता शे दोनशे कोटी तर चिंचोक्या सारखे मिळवतात.तर मग,या शेतकऱ्यांना आठ नऊ लाख मिळवून देणे काहीच कठीण नाही.जर किशोर आप्पांनी हा विषय मनावर घेतला नाही तर गाळण आणि इतर खेड्यात बैनर झळकतील.
” आमचे आमदार श्री किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही.
म्हणून आम्ही शेतकरी पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदान करणार नाहीत.”
आमदार किशोर पाटील यांनी काय असेल ती अक्कल,नक्कल,शक्कल वापरावी आणि या शेतकऱ्यांना त्यांच्या बागायत शेतीचा मोबदला मिळवून द्यावा.अन्यथा पुढील निवडणुकीत उमेदवारी व निवडणूक खर्च वाया जाईल.
असाच प्रयोग आम्ही बोंडअळीची नुकसानभरपाई मिळवण्यासाठी पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथे केला होता.आमदार सतीष पाटील यांना बदलून टाकण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत.आमदार बदलला.तसा पाचोरा चे आमदार बदलण्याची ही सुरुवात झाली आहे.माननिय, सन्माननीय, आदरणीय आमदार किशोर पाटलांनी आपला गड राखण्यासाठी आजपासून सुरुवात करावी.कामाला लागावे.

शिवराम पाटील ,९२७०९६३१२२,महाराष्ट्र जागृत जनमंच,.जळगाव

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

राज्यात आता दोन दिवस पावसाचे! कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट

मॉन्सूनने आता पूर्ण राज्य व्यापले आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार 15 जूनपर्यंत मॉन्सूनने राज्य व्यापले असून आता त्याचा पुढील प्रवास वेगाने

सुनसगाव विद्यालयात अनोख्या आदर्श पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – ग्रामिण भागात बैलगाडी हे वाहन म्हणून सहसा कोणी वापर करीत नाही बालकांपासून तर वयोवृद्धांना

बद्रीनाथमध्ये 23 प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

रुद्रप्रयाग  – बद्रीनाथ इथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर उलटून भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ

विमान उड…मोदी उड…शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे सुरू

नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा एनडीएच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच ते इटली दौऱयावर गेले

राज्यात आता दोन दिवस पावसाचे! कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट

मॉन्सूनने आता पूर्ण राज्य व्यापले आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार 15 जूनपर्यंत मॉन्सूनने राज्य व्यापले असून आता त्याचा पुढील प्रवास वेगाने

सुनसगाव विद्यालयात अनोख्या आदर्श पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – ग्रामिण भागात बैलगाडी हे वाहन म्हणून सहसा कोणी वापर करीत नाही बालकांपासून तर वयोवृद्धांना

बद्रीनाथमध्ये 23 प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

रुद्रप्रयाग  – बद्रीनाथ इथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर उलटून भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ

विमान उड…मोदी उड…शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे सुरू

नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा एनडीएच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच ते इटली दौऱयावर गेले

रशियामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे पार्थिव परिवाराच्या ताब्यात

जळगाव – जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेले होते चार जून रोजी मंगळवारी रात्री घरी बोलल्यानंतर बोलत असताना वोल्खोव्हा नदीच्या

मान्सूनबाबत IMD कडून धडकी भरवणारी अपडेट ;  शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, काय आहे वाचा

जळगाव – दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. यामुळे विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील

ECHS भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती, 8वी ते पदवीधरांना संधी..

भुसावळ – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना(ECHS) भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. आठवी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारला दिली एक महिन्याची डेडलाईन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील

धक्कादायक !  दिव्यांग पतीला विहिरीत ढकलत केला खून; पत्नीविरुद्ध गुन्हा

धरणगाव – शेतातील मंदिरात मुंजोबा देवाच्या पाया पडण्याच्या बहाण्याने घेऊन जात दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची खळबळजनक घटना

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर ; नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ

जळगाव – पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून