लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरु राहणार? एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई – राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना ही केवळ विधानसभा निवडणुकीसाठीचा जुमला असून, त्यानंतर ही योजना बंद पडणार असल्याचा दावा विरोधकांकडून सतत केला जातो.

तर विरोधकांचा हा दावा महायुतीतील नेत्यांकडून खोडून काढला जातो.

अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरु राहणार याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. आदिवाशी दिनानिमित्त आदिवासी पाड्यात जाऊन संवाद साधताना त्यांनी या योजनेबद्दल वक्तव्य केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “17 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हफ्ते जमा होतील. मी जो शब्द दिला, म्हणजे दिला आणि शब्द दिल्यावर मी शांत बसत नाही. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. ते म्हणताय ही योजना सुरु राहणार नाही. त्यामुळे या लाडक्या भावांपासून (विरोधकांपासून) सावधान रहा.”

लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राहणार

 

लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) कायम राहणार आहे. जेव्हापासून आम्ही योजना राबवली तेव्हापासूनच विरोधकांना पोटदुखी झाली. मी ज्या ठिकाणी दौऱ्याला जातो, तिथे माझ्या लाडक्या बहिणी मला राखी देखील बांधतात. याला देखील नशीब लागतं. माझी एकच सख्खी बहिण होती पण आता महाराष्ट्रात लाखो बहीणी असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावेळी त्यांनी विरोधक या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू नये यासाठी संभ्रम निर्माण करत असल्याची टीका केली. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे. मात्र, या योजनेचे लाभ तुम्हाला मिळू नये, यासाठी अनेक सावत्र भाऊ संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या सख्या भावावर विश्वास ठेवा, आवाहनही त्यांनी शिंदेंनी केलं.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh