किरकोळ कारणावरून समाजकंटकांनी गावात एकमेकांच्या अंगावर धावून जात दगडफेक केल्याने महिला व लहान मूला मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर प्रकारामुळे गावातील शेकडो स्त्री पुरुष रस्त्यावर उतरून येथील पोलिस चौकी समोर ठिय्या मांडून दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली होती. सदर घटनेची माहिती सावदा पो स्टे चे सपोनी जालिंदर पळे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिह आपल्या फौजफाट्यासह घटना स्थळी उपस्थित होत परिस्थिती नियंत्रणात आणली
दरम्यान घटना कशामुळे घडली ह्याचा तपास पोलीस करीत असून रात्री उशिरा येथील एका माधुरी महाजन या महिलेने सावदा पोलिस स्टेशन ला या बाबत तक्रार दाखल केली यात रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान मी वाॅकिग करीत असताना वाघोदा रोड ते मेस्को मळा परिसरात मोठ्याने आरडाओरडा चालू असल्याचा आवाज येत असल्याने मी व माझे सोबत असलेली वर्षा महाजन आमचे कडे मोठा जमाव दगडफेक करीत पळत येऊन लज्जा येईल असे वर्तन केले. तसेच महादेव वाडा, महाजन वाडा परिसरात दगडफेक करीत मोटरसायकलचे पण नुकसान केले याच दरम्यान माझे 2 तोळे सोन्याचे मंगळसूत्र पण तोडले गेले आहे. यात सदर महिलेने 4 व्यक्तींची नावे सांगितली असून दिडशे ते दोनशे जणांचा जमाव पळत येत होता असे तक्रारीत नमूद केले आहे
दरम्यान भादवि कलम 392 ,354 ,व 427 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आले . या नतंर रात्री उशीरा फैजपूर उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी चिनावल येथे दिनांक 18 चे मध्यरात्री पासून दि 20 मे च्या रात्री 1 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याचा आदेश पारित केला आहे
आज दि 18 रोजी गावात पूर्णपणे व्यवहार बंद असून संचारबंदी बंदी मुळे जनजीवन विस्कळित झाले आहे शेतात जाणारे शेतमजूर, दैनंदिन उघडणारे आस्थपने , किराणा,दुध डेअरी,हे बंद असून रस्त्यावर शुकशुकाट आहे . तर गावात स्थानिक सावदा पोलिस सह फैजपूर,निभोरा,रावेर येथुन अतिरिक्त कुमक तसेच राज्य राखीव दलाचे जवान गावात तगडा बंदोबस्त ठेवून आहेत . मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे,सपोनि जालिंदर पळे,पो उप निरीक्षक खांडबहाले,गर्जे हे तळ ठोकून आहेत परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणाव कायम आहे.
चिनावल येथे शुकशुकाटाचे वातावरण
काल रात्री झालेल्या दगडफेक नतंर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मध्यरात्री नतंर चिनावल येथे तब्बल 3 दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे आज दि 18 रोजी सकाळी पोलिस प्रशासनाच्या कडक अंमलबजावणीत गुरे पालक, दुग्ध व्यवसायीक, शेतमजूर यांची मोठी तारांबळ उडाली. अनवधानाने बाहेर पडलेल्या अनेक जणांना पोलिसी खाक्याला सामोरे जावे लागले. या मुळे आज दिवसभरात चिनावलात एक प्रकारे स्मशान शांतता होती त्यामुळे गावात शांतता अनुभवायला मिळाली.
चिनावल च्या या दंगली ची झळ अक्षरशः देवालाही सोसावी लागत आहे गावात श्रीमद् भागवत पारायण कथा सुरू आहे. मात्र आज लागलेल्या संचारबंदी मुळे सकाळची काकडा आरती,पारायण, हरिपाठ व किर्तन बंद द्वार करण्यात येत असल्याने भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचली आहे,तर गावातील मंदीरे ही आज बंदच होती. या मुळे भाविकांना ” अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला ” या जनाबाई च्या अभंगांची आठवण झाली.