भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ममुराबाद – जळगाव विदगाव रस्त्यावरील भीषण अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ममुराबाद पासुन जवळच कृषी फार्म जवळ बैलांना घेऊन ममुराबाद कडुन जळगाव कडे येत असलेल्या टाटा कंपनीची छोटा हत्ती MH-19-CY- 8172 या वाहानाने सुरेश गणपत कुंभार यांच्या दुचाकी क्रमांक MH-41- H-9941 ला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सुरेश कुंभार वय 40 यांना डोक्याला जबर दुखापत झाल्याने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातानंतर दुचाकीला धडक दिलेल्या वाहन चालकाने वाहन घटनास्थळी सोडुन पलायन केले.

तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार,पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौ.माणिक सपकाळे.ज्ञानेश्वर कोळी, यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहे.

विदगाव जळगाव रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून यात जीवितहानी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.या रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग हे अपघातांचे प्रमुख कारण बनले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh