डॉ. सुनिल पाटील यांची प्रिस्क्रिप्शनद्वारे कोविड लसीकरण जनजागृती…

दिपक नेवे

मोदी सरकारच्या जगातील सर्वात मोठ्या मोफत कोविड लसीकरण अभियानाची प्रसिद्धी भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा सहसंयोजक डॉ. सुनिल पाटील साकळीकर यांनी प्रीस्क्रिप्शनवर उल्लेख केलेल्या औषध पत्रकाचे अनावरण भाजपा जिल्हा ध्यक्ष आमदार सुरेश (राजुमामा ) भोळे यांच्या हस्ते जळगाव येथे राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान कार्यशाळा प्रसंगी करण्यात आले.

रुग्ण तपासणी झाल्यावर प्रीस्क्रिप्शन दिले जाते. त्याची मागील बाजू नेहमी कोरीच असते.हे लक्षात घेऊन साकळी ता. यावल येथील भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सहसंयोजक डॉ. सुनिल पाटील त्यावर मोदी सरकारच्या सर्वांसाठी मोफत जगातील सर्वात मोठया कोविड लसीकरण अभियान व त्यासाठी च्या तरतुदी कोरोना हरणार भारत जिंकणार , लस घ्या सुरक्षित रहा,आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोना ला हरवू या, आपल्या पात्रता टप्प्यानुसार कोविड लसीकरण करून घ्या,असे छापून प्रचार व प्रसार डॉ सुनिल पाटील यांनी प्रिस्क्रिप्शन पेपरच्या मागील बाजूस प्रसारित केले आहे.

याआधी डॉ. सुनिल पाटील साकळीकर यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्प मधील आरोग्य क्षेत्रासाठी असलेल्या देशाच्या इतिहासातील 2लाख 23 हजार कोटींच्या तरतुदी बाबत मुद्दे प्रिस्क्रिप्शन पॅड वरील मागील कोऱ्या बाजूस प्रकाशित केले आहे होते.

त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक मा.आ.गिरीश महाजन, मा.खा.उन्मेश पाटील, मा.खा.रक्षा खडसे , भाजपा जिल्हा अध्यक्ष मा.आ.राजुमामा भोळे,बेटी बचाओ बेटी पढाओ चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके,महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे, होमिओपॅथी संयोजक डॉ. भालचंद्र ठाकरे, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तू.पाटील, जळगाव जिल्हा संयोजक डॉ. नरेंद्र ठाकूर, जळगाव महानगर संयोजक डॉ. धर्मेंद्र पाटील, भाजपा महानगर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, मा.डॉ. कुंदन फेगडे , नगरसेवक यावल, मा. रवींद्र सूर्यभान पाटील आरोग्य सभापती जि.प. जळगाव, दीपक अण्णा पाटील प्रभारी सभापती प.स.यावल,डॉ. कुंदन फेगडे, नगरसेवक यावल, जामनेर न.पा. गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. संजीव पाटील, डॉ. केयुर चौधरी, डॉ. महेंद्रसिंग राठोड चाळीसगाव यांनी केले आहे.