जळगाव – इष्टतम विकासासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी उत्तेजक वातावरण आवश्यक असून प्लेस्कूल बाळांना आणि लहान मुलांना लवकर शिकण्याचे विविध अनुभव देतात असे प्रतिपादन डॉ. मोहसीन शेख यांनी पिंप्राळा येथील वेदबोध बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्लेस्कूलचे उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी वेदबोध बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे
प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनिअर केजी आदि विभागाचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिबीनाची फित कापून शुभारंभ करण्यात आला.
पुढे डॉ.शेख म्हणाले की, प्लेस्कूल हा मुलांसाठी जगाबद्दल शिकण्याचा, मित्र बनवण्याचा आणि सामाजिक कौशल्ये विकसित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. मोहसीन शेख, डॉ.दीपरत्न मोरे, सतीश मोरे,संस्थेच्या संचालिका सौ.माधुरी तायडे,सामाजिक,
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.